आम्ही नाही, इतर कंपन्या मागतात जादा चार्ज- जिओ कंपनी

465

जिओव्यतिरिक्त नेटवर्कशी संपर्क साधायचा असेल तर रिलायन्स जिओने 6 पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज आकारायला नुकतीच सुरुवात केली आहे. त्यावरून वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी जिओ कंपनीवर टीका करायला सुरुवात केली. मात्र त्याला ‘आम्ही नाही, इतर कंपन्या आमच्याकडून जादा चार्जची मागणी करतात’ असे सडेतोड उत्तर रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सोमवारी दिले. एकापाठोपाठ ट्विट करीत रिलायन्स जिओने नाव न घेता वोडाफोन, आयडिया आणि एअरटेल कंपन्यांवर शरसंधान केले. रिलायन्सने आपल्या 6 पैसे प्रति मिनिट दर आकारणीसाठी या कंपन्यांनाच जबाबदार ठरविले.

आपली प्रतिक्रिया द्या