कॉलेज फेस्टमध्ये मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो काढले

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील एका सरकारी महाविद्यालयात युवा महोत्सवात कपडे बदलताना विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकार्ंडग झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. त्यामध्ये चार मुले एका खोलीबाहेर एकत्र जमलेले, एकमेकांच्या खांद्यावर उभे असलेले आणि व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. ही मुले अभाविपची असल्याचा आरोप राज्य काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भानपुरा सरकारी महाविद्यालयात निदर्शने केली.