
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटच्या शूटिंगदरम्यान सेटवरील जवळपास 120 जणांना विषबाधा झाली. लडाखमध्ये शूटिंग सुरू असताना क्रू मेंबर्सना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी घडली. जेवणानंतर अनेकांना पोटदुखी, उलटय़ा, डोकेदुखी व अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने एसएनएम रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर विषबाधेचे निदान डॉक्टरांनी केले.