
डोंबिवलीत काही तरुणांनी शुक्रवारी बैलाचा वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे.
शुक्रवारी डोंबिवलीत किरण म्हात्रे या तरुणाने आपल्या बैलाचा रेतीबंदर येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. या वाढदिवसाला 50 जण उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोविडच्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळण्यात आले नव्हते तसेच कोणीही मास्क घातले नव्हते.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी साथरोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केला. असेच किरण म्हात्रेला या प्रकरणी अटक केली होती.





























































