
कोरोनाशी लढताना पेशंटना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रेल्वेने रो रो सेवेद्वारे ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंत्रालयाने 47 ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे विविध राज्यांत आतापर्यंत 2960 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहचविला आहे.
महाराष्ट्राला आतापर्यंत 174 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश 729 मे. टन, मध्य प्रदेशला 249 मे. टन, हरयाणाला 305 मे. टन, तेलंगणाला 123 मे. टन तर 1334 मे. टन ऑक्सिजन दिल्लीला पुरविण्यात आला आहे.
सध्या 18 टँकरद्वारे 260 टनांहून अधिक लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीच्या दिशेला निघाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आपल्या प्रवासाला निघणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

























































