मग शंभरची नोटाबंदी करा, चिदंबरम यांनी काढला चिमटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2019-20  चा अर्थसंकल्प सादर झाला असून मोदी सरकारने मध्यम वर्गीय, शेतकरीसह सर्व वर्गाला खुष करण्यासाठी मोठ मोठ्या तरतूदी केल्या आहेत. अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला नोटाबंदी झालेल्या वर्षात विकासदर 8.2 टक्के होता अशी आकडेवारी सरकारने प्रसिद्ध केली आहे.

या मुद्द्याला धरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोमणा मारला आहे. चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “जर नोटाबंदीमुळे विकासदर 8.2 टक्क्यांवर होता तर यंदा पुन्हा नोटाबंदी करा. आणि यावेळेला १०० रुपयांची नोट बंद करू दाखवा” असा चिमटा चिदंबरम यांनी काढला आहे.