‘पद्म’ पुरस्कारात महाराष्ट्राचा डंका! जॉर्ज फर्नांडिस, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’

412

देशाचे माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ सन्मान जाहीर झाला आहे. माजी संरक्षणमंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे, ‘आदर्शगाव’ हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, क्रिकेटपटू झहीर खान, अभिनेत्री कंगना रणौत, डॉ. रमण गंगाखेडकर, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक एकता कपूरसह 118 जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, ‘पद्म’ पुरस्कारात मराठीची मोहोर पुन्हा उमटली असून, महाराष्ट्राचा डंका वाजला आहे.

suresh-wadkar-rahibai-popar

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झालेला नाही. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ सातजणांना देण्यात येणार आहे. 16 मान्यवरांना ‘पद्मभूषण’ तर 118 जणांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण
– सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस. (मरणोत्तर)
– मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ.
– ज्येष्ठ शास्त्रीय गायक चन्नुलाल मिश्रा.
– श्री विश्वेशातीर्थ स्वामीजी श्री पेजावरा अधोखजामठ, उडुपी. (मरणोत्तर)
– प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा
– बॉक्सर मेरी कोम

पद्मभूषण
– मनोहर पर्रीकर (मरणोत्तर)
– ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजोय चक्रवर्ती
– प्रसिद्ध आर्टिटेक्चर बाळकृष्ण जोशी
– नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस. सी. जमीर
– सामाजिक कार्यकर्ते अनिल प्रकाश जोशी
– जम्मू-कश्मीरातील नेते मुजफ्फर हुसेन बेग
– केरळमधील सामाजिक कार्यकर्त्या एम. मुमताज अली
– साहित्यिक मनोज दास
– सामाजिक कार्यकर्ते कृष्णामल्ला जगन्नाथन
– राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नीलकांता रामकृष्णा, मनोहर गोपाळकृष्णा
– साहित्यिक जगदीश शेठ
– बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू
– उद्योगपती वेणू श्रीनिवासन
-बांगलादेशातील दिवंगत नेते सईद मुआजिम अली
– लडाखमधील डॉ. तेसरींग
– दिवंगत नेते माधव मेनन

महाराष्ट्रातील 11 जणांना ‘पद्मश्री’ सन्मान
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 118 नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे.
– दुर्मिळ बियाणांचे संकलन करणाऱया नगर जिह्यातील अकोले तालुक्यातील ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. देशी बियाण्यांच्या बँकर म्हणूनही त्या ओळखल्या जातात.
– नगर जिल्ह्यातील हिवरेगावचा कायापालट करणारे, आदर्श गाव निर्माण करणारे माजी सरपंच पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. जलसंधारणाच्या क्षेत्रात पवार यांनी उल्लेखनीय काम राज्यात अनेक ठिकाणी केले आहे.
– त्याचबरोबर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, क्रिकेटपटू झहीर खान, अभिनेत्री कंगना रनौट, डॉ. रमण गंगाखेडकर, प्रसिद्ध समाजसेवक सय्यद महेबूब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर, करण जोहर, सरिता जोशी, प्रसिद्ध गायक अदनान सामी, प्रसिद्ध डॉ. सांद्रा डिसोजा यांना ‘पदमश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आनंद महिंद्रा आणि मेरी कोम यांचाही सन्मान
ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा, ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजोय चक्रवर्ती, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह 16 जणांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात येणार आहे. तर जगप्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कोम यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री मानकरी
सुरेश वाडकर
राहीबाई पोपेरे
पोपटराव पवार
झहीर खान
एकता कपूर
कंगना रणौत

आपली प्रतिक्रिया द्या