
‘भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना’ हे ब्रीद असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता लालबागच्या गणेश गल्ली येथील मैदानात होणार आहे. गणेशभक्तांनी मोठय़ा संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन शाखाप्रमुख तसेच मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी केले आहे.






























































