पै फ्रेंड्स लायब्ररीचा दहा वर्षांचा ऑनलाइन प्रवास 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररीने ऑनलाईन व्यवसायाची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. एकीकडे ज्या काळी ऑनलाइन शॉपिंगचे पीकसुद्धा आलं नव्हतं त्यावेळी लायब्ररीसारखा व्यवसाय ऑनलाइन करण्याचा धाडसी निर्णय पुंडलिक पै यांनी घेतला होता. या निर्णयाला आज २९ ऑक्टोबर रोजी दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

www.friendslibrary.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील अनोखी लायब्ररी आहे. लायब्ररीचे ऍप असलेली पै लायब्ररी ही एकमेव लायब्ररी आहे ज्या वरून तुम्हाला पुस्तकांची ऑर्डर देत येते. वेबसाईटच्या माध्यमातून केवळ काही क्लिकने तुम्ही पुस्तकं मागवू शकता आणि ती वाचकाम्णा घरपोच वाचण्यासाठी मिळतील.

पै लायब्ररीला १० वर्ष झाल्याच्या निमित्ताने नवीन उपक्रम लायब्ररी हाती घेत आहे. दिवाळी अंक जगभरात कुठेही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुंडलिक पै यांनी घेतला आहे. आतापर्यंत फराळ परदेशात जायचा आता फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून दिवाळी अंक परदेशात जाणार असल्याचे पै यांनी सांगितले. येत्या २ वर्षात घरपोच सेवा देणारी लायब्ररी संपूर्ण महाराष्ट्रात चालू करण्याचा निश्चय पै यांनी केला आहे.

पै लायब्ररीने राबवलेल्या नव्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फोनवरसुद्धा पुस्तक ऑर्डर करू शकता त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन पुस्तकांची माहितीही वाचकांना उपलब्ध करण्यात आली आहे. लायब्ररी सध्या २.५ लाखाहून अधिक पुस्तके आहे. तर दरवर्षी १५० हुन अधिक दिवाळी अंक लायब्ररी मध्ये येतात. मागणी असलेल्या विशेष दिवाळी अंकांची संस्था २०० हून अधिक कॉपी घेतात, जेणेकरून सर्व वाचकांना दिवाळी अंक वाचायला मिळतील. पुस्तकांसह आता दिवाळी अंकही घरपोच करणारी पै फ्रेंड्स लायब्ररी ही एकमेव लायब्ररी आहे.