पैशांचा पाऊस भाग ४७- ‘हेल्थ इज वेल्थ’

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

आज मेडिकल टेक्नॉलॉजीचा विकास झाल्यामुळे मनुश्याच्या सरासरी आयुश्यात नोंदपात्र वाढ झालेली आहे. सध्या मेडिकलचा किंवा डॉक्टरांचा खर्च भरमसाठ वाढलेला आहे. आजच्या काळात कॅन्सर, हृदयरोग सांध्याचे दुखणे किंवा नी—रिप्लेसमेन्ट या सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. अशा रोगांचा उपचार करणे सामान्य माणसांसाठी कठिण झाले आहे. अषा बाबतीत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही एक आशीर्वादच ठरते

आपण उदाहरणावरून ही गोष्ट समजून घेऊ शकतो. मध्यमवर्गीय परिवारातील सागर याचा मासिक पगार रू. 15000 आहे. त्यांच्या परिवारात त्यांचे आई—वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. घरचा खर्च चालविणे त्यांच्यासाठी थोडे कठिणच आहे. एक दिवस त्यांचा अकस्मात अपघात होऊन त्यांना गंभी लागले. दवाखान्याचे बिल खूपच जास्त आले आणि अचानकपणे सागर गंभीर आर्थिक संकटात सापडले. पण सागर आणि त्यांचा परिवार या संकटातून सुखरूप् बाहेर पडले कारण की, त्यांनी स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा हेल्थ इन्शुरन्स

आता तुम्ही स्वतःला सागर यांच्या जागेवर ठेवा आणि विचार करा की, तुमच्या जवळ हेल्थ इन्शुरन्स नसते तर काय झाले असते? वरील उदाहरणात सांगितले आहे त्याप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स तुम्हांला एका निश्चित केलेल्या रकमेचे आरोग्य कवच देते. आवष्यक हेल्थ इन्शुरन्स घेतल्याने विमा धारक आर्थिक चिंतेमधून मुक्त होतो.

हेल्थ पॉलिसीचे प्रकार :—
फॅमिली फ्लोटर पॉलिसी (Family Floater Policy) :—
या पॉलिसी अंतर्गत संपूर्ण परिवाराला एकाच प्रिमियममध्ये कवर केले जाते. यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या. त्यांच्या कुटुंबात 4 सभासद आहेत. त्यासाठी वेगवेगळी पॉलिसी उपयुक्त ठरते.

इंडिविज्युअल पॉलिसी? (Individual Policy) :—
या पॉलिसी अंतर्गत प्रत्येक सभासदाला वेगवेगळे पॉलिसी कवर दिले जाते आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रिमियम भरावे लागते.

दोन प्रकारे आरोग्य विम्याचे क्लेम सेटल केले जाऊ शकतात
01. कॅशलेस : कॅशलेस ट्रीटमेन्ट मिळविण्यासाठी टीपीएला (Third Party Administartor) । अगोदरच किंवा निश्चित कालमर्यादेत माहिती करून पाहिजे. रूग्णालयात असलेला इन्शुरन्स डेस्क सर्व पेपरवर्कसाठी तुम्हांला मदत करते. क्लेमची रक्कम टीपीए द्वारे मंजूर करणे आवष्यक आहे. त्यानंतर रूग्णालय ती रक्कम टीपीए सोबत निष्चित करते. साधारणपणे काही रक्कम काढली जाते आणि ती रक्कम सरळ रूग्णालयात सेटल केली जाते.

02. रिएम्बर्समेन्ट : पॉलिसी धारकाला या विकल्पा अंतर्गत नेटवर्क आणि नॉन नेटवर्क हॉस्पिटल्स असे दोन्ही स्तरावर रिईम्बर्समेन्टची सवलत मिळू शकते. त्यात पॉलिसी धारक स्वतःच रूग्णालयाचे सर्व बिल रूग्णालयामध्ये चुकते करतो आणि जरूरी सर्वच बिल आणि दस्तावेज रुग्णालयातून घेऊन ते टीपीए समोर सादर करतो. त्यांच्या शर्ती आणि नियमांच्या अटीनुसार त्या खर्चाची रक्कम परत मिळवण्यासाठी क्लेम केला जो शकतो. प्रत्येक कंपनीचे पॉलिसी विषयाचे नियम आणि अटी वेगवेगळ्या असतात कोणतही पॉलिसी घेण्याअगोदर तुम्ही सर्व माहिती मिळवली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या