
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थान पाकिस्तानमधील तणावात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, पाकिस्तानमधून दहशतवादी कारवाया होऊ नये अशी पाकिस्तानची इच्छा आहे. तसेच आम्ही हिंदुस्थानला सांगू इच्छितो की या तणावावर आपण सांमजस्याने आणि विचारपूर्वक तोडगा काढला पाहिजे, अशी विनवणी त्यांनी केली.
खान म्हणाले की, “पहिले महायुद्ध सहा वर्ष चालले, दुसर्या महायुद्धात हिटलरला रशिया जिंकायचे होते परंतु ते शक्य झाले नाही. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिका अफगाणिस्तानमध्ये 17 वर्ष अडकला.”
तसेच “युद्ध सुरू झाले तर त्यावर ना नरेंद्र मोंदींचे नियंत्रण असेल ना माझे,” असेही खान म्हणाले. तोडगा काढण्यासाठी चर्चेचे आमंत्रण देताना इमरान खान म्हणाले की, “मी नरेंद्र मोदींना चर्चेसाठी निमंत्रण देतो, की पुलवामाबाबत जे काही झाले त्यावर चर्चा करून तोडगा काढू. तसेच पुलावामामध्ये जे झाले त्यानंतर हिंदुस्थानला जे भोगावे लागले त्याबाबत मला कल्पना आहे. गेल्या 10 वर्षांत मी अनेक इस्पितळांना भेट दिली. बॉम्ब स्फोटात जखमी झालेल्या लोकांना पाहिले आहे.” मृतांच्या कुटुंबीयांना काय वाटतं हे मला माहित असल्याचे खान यांनी म्हटले.‘
























































