पाकिस्तानच्या 26 ड्रोन्सची हिंदुस्थानात घुसखोरी, ड्रोनच्या हल्ल्यात एक हिंदुस्थानी जखमी

पाकिस्तानने हिंदुस्थानात वेगेवगळ्या ठिकाणी 26 ड्रोन पाठवले आहेत. हे ड्रोन देशाच्या अनेक भागात घिरट्या घालताना दिसले आहेत. या ड्रोनमध्ये हत्यारेही असल्याचे समोर आले आहे.

सुरक्षा मंत्रालयाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्ताने हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागात ड्रोन पाठवले आहेत. हे ड्रोन जम्मू कश्मीर पासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हे घिरट्या घालताना दिसले आहेत.

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका सशस्त्र ड्रोनने रहिवासी भागाला लक्ष्य केले आहे. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. पाकिसातनने बारामुल्लाह, श्रीनगर, अवंतीपोरा, नाग्रोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिलका, लालढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुराबेट आणि लाखी नाला भागात ड्रोन पाठवले आहेत. सीमेवर हाय अलर्ट असून प्रत्येक ड्रोनवर लक्ष ठेवले जात आहे. हिंदुस्थानी सेना काऊंटर ड्रोन सिस्टम्सच्या मतदीने हे ड्रोन्स नष्ट केले जात आहे.