पाकड्यांचा मीडियाही खोटारडा; हिंदुस्थानविरोधात अपप्रचाराचा डाव

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. मात्र तरीही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याच नावंच घेत नाही. पाकिस्तान सातत्याने हिंदुस्तान विरोधात खोटी विधाने करत आहे. दरम्यान आता पाकिस्तान आपल्या वॉर रूममध्येही खोट्या स्क्रिप्ट तयार करत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अध्यक्षतेखाली जनरल मुख्यालयात (GHQ) झालेल्या विशेष कॉर्प्स कमांडर्स परिषदेत पुन्हा एकदा हिंदुस्थानला लक्ष्य करण्यात आले. या बैठकीत, पहलगाम हल्ल्याबाबत हिंदुस्थानवर केवळ खोटे आरोप करण्यात आले. तसेच सिंधू पाणी कराराबाबत हिंदुस्थानच्या हेतूंवरही शंका उपस्थित करण्यात आल्या.

पाकिस्तानची परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत चाचली आहे. मात्र तरीही त्यांचा अडेलतट्टूपणा जात नाही. नुकत्याच झालेल्या कॉर्प्स कमांडर्स परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानी सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी तयार असल्याचा दावा केला आहे. जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि प्रत्येक संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानी सैन्यावर नियंत्रण रेषेवर (LOC) नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला.

कॉर्प्स कमांडरच्या सहकार्याने लिहिली खोटी स्क्रिप्ट
पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांचा वापर करून हिंदुस्थान राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असेकॉर्प्स कमांडर्सनी सांगितले. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ला आणि कलम 370 रद्द करण्याचा उल्लेख केला. हिंदुस्थान एक टेम्पलेट फॉलो करत आहे. यामध्ये दहशतवादी घटनांचा वापर कश्मीरची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे अनेक खोटे दावे त्यांनी यावेळी केले.

दरम्यान हिंदुस्थान सिंधू पाणी कराराचाही शस्त्र म्हणून वापर करत आहे., असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हिंदुस्थान पाकिस्तानचे पाण्याचे हक्क हिरावून घेत आहेत. त्यामुळे 24 कोटी पाकिस्तानी नागरिकांच्या जीवनासाठी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या आक्रमक राजनितीला योग्य उत्तर दिले जाईल, असे दावा बैठकीत करण्यात आला