
सामना ऑनलाईन । श्रीनगर
पाकड्यांची मस्ती कायम असून जम्मू-कश्मीरात त्राल येथे हिंदुस्थानी लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात एक जवान शहीद झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
रात्री नऊच्या सुमारास त्राल येथे लष्कराच्या 42 क्रमांकाच्या तळावर बेछूट गोळीबार करीत दहशतवादी घुसले. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. जखमी जवानाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लष्कराची मोहीम सुरू होती.
पाच दिवसांत दुसरा हल्ला
कश्मीर खोऱयात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. 21 ऑक्टोबरला कुलगाम येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले होते.
summary- pakistan attacked indian base camp one martyr
























































