
कलम 370 हटवल्यानंतर हिंदुस्थानला जगभरातून मिळणारा पाठिंबा आणि पाकिस्तानच्या पडलेली घोर निराशा यामुळे पंतप्रधान इम्रान खान देशातील जनतेचा विश्वास गमावण्याच्या स्थितीत आहेत. अशात पाकिस्तानच्या नागरिकांची मने जिंकण्यासाठी आणि जगभराचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी क्षेपणास्त्राचे परिक्षण केले. या क्षेपणास्त्राचे नाव गजनवी आहे. क्षेपणास्त्राला गजनवी नाव देण्यामागे हिंदुस्थानला डिवचण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे दिसत आहेत.
महमूद गजनवी हा मध्य अफगाणिस्तान मधील गझनी येथील गजनवी वंशातील एक अत्यंत क्रूर शासक होता. जो ईराणच्या पूर्वेकडील भागाचा साम्राज्य विस्तारासाठी ओळखला जातो. हिंदुस्थानात इस्लामी शासन आणण्यासाठी त्याने मोठ्या खूप प्रयत्न केले. हिंदुस्थानच्या मंदिर तसेच समृद्ध शहरांवार हल्ले करून त्याने वैभव मोठ्या प्रमाणावर लुटून नेले. त्याने हिंदू संस्कृती नष्ट करण्याच्या दृष्टीने आणि वैभव आपल्या राज्यात लुटून नेण्यासाठी त्याने आपल्या कार्यकाळात तब्बल 17 वेळा स्वारी केली होती.
तो मुळचा तुर्कस्तानचा होता आणि अन्य तुर्की राजाप्रमाणे पूर्वेत एक सुन्नी इस्लामी साम्राज्य बनवण्यात तो यशस्वी झाला होता. त्याने पूर्व ईराण, अफगाणिस्तान आणि मध्य-एशिया, पाकिस्तान आणि हिंदुस्तानाचा वायव्येकडील काही भागावर त्याने शासन केले.

























































