
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर हिंदुस्थानने 25 देशांच्या राजदुतांची बैठक बोलावली होती. या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्स या देशांचाही समावेश आहे. या बैठकीत पाकिस्तानचे विदेश कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल म्हणाले की हिंदुस्थानने लावलेले आरोप बिनबुडाचे आहे. नवी दिल्लीचा आक्रमक पवित्रा त्यांच्यासाठी धोकादायक आहेच तसेच या भागातील शांततेला धोका पोहोचवणार असेल.”
Briefing by FS to resident Ambassadors regarding #PulwamaAttack continue at MOFA. #African Ambassadors briefed today. Deliberate anti-Pakistan frenzy being spurred in India. Baseless Indian allegations & aggressive rhetoric counterproductive&threat to regional peace. pic.twitter.com/yQTuikfEZf
— Dr Mohammad Faisal (@ForeignOfficePk) February 17, 2019
पाकिस्तानी अधिकार्यांनी सांगितले की, “पुलवामा हल्ल्याची जागतिक स्तरातून टीका झाल्यानंतर राजदूतांनी इतर देशांना माहिती देण्यास सुरूवात केली. कारण हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा आरोप हिंदुस्थानने केला आहे आणि तो खोटा आहे. तसेच याबाबत पी 5 देश, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, युरोपीय संघालाही माहिती देण्यात आली आहे.”
हिंदुस्थानने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्यापैकी मोस्ट फेवरड नेशनचा दर्जा काढणे, निर्यात कर 200 टक्के करणे सारख्या गोष्टी केल्या आहेत. भेदरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानचा दहशतवादी हल्ल्याचा आरोप खोटा असल्याचा कांगावा केला आहे.


























































