
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (HEC) विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. कायदे-ए-आझम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 12 जून रोजी कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्यानंतर आणि या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी एचईसीचा आदेश आला आहे.
एका नोटीसमध्ये आयोगानं म्हटलं आहे की, ‘सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचं’ पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उत्सवाचं पालन करण्यास मनाई आहे.
‘अशा कारवाया देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांपासून पूर्णपणे खंडित झाल्याचं चित्रण करतात आणि देशाच्या इस्लामिक अस्मितेचा ऱ्हास करतात’, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
कायदे-ए-आझम विद्यापीठातील होळी उत्सवाच्या संदर्भात, आयोगानं म्हटलं आहे, ‘विद्यापीठाच्या परिसरातून झालेल्या या कार्यक्रमामुळे चिंता निर्माण झाली आहे आणि देशाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे’.
Holi celebrations in Quaid-I-Azam University Islamabad Pakistan 🍁
Biggest holi celebration in Pakistan 💓 pic.twitter.com/xdBXwYEglt— QAU News (@NewsQau) June 13, 2023
विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम आयोजित करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला देताना आयोगानं म्हटलं आहे की, ‘असx सुचवण्यात आलं आहे की HELS देशाच्या ओळख आणि सामाजिक मूल्यांशी स्पष्टपणे विसंगत अशा सर्व कृतींपासून दूर राहतील आणि ते कठोरपणे नियमांचं पालन करतील अशी खात्री करून घ्या’.
या महिन्याच्या सुरुवातीला इस्लामाबादमधील कायद-ए-आझम विद्यापीठात होळी साजरी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. व्हिडीओंमध्ये विद्यार्थी रंगांची होळी खेळताना आणि कॉलेज कॅम्पसमध्ये सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसत आहेत.
हा कार्यक्रम विद्यापीठाच्या बिगर-राजकीय सांस्कृतिक संघटनेच्या मेहरान विद्यार्थी परिषदेने आयोजित केला होता, असं अहवालात म्हटलं आहे.
मार्चमध्ये, कट्टरपंथी इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी पंजाब विद्यापीठाच्या आवारात होळी साजरी करण्यापासून रोखल्यानं झालेल्या हाणामारीत किमान 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले होते.



























































