आजचा दिवस गर्भनिरोधकांचं महत्त्व सांगतो, मंत्र्याने मोदींवरील टीकेची पातळी सोडली

1840

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मंगळवारी 69 वा वाढदिवस आहे. देश, विदेशातील नेत्यांनी आणि प्रमुखांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे. हुसैन यांनी पातळी सोडून मोदींवर टीका केल्याने पाकिस्तानमध्येच त्यांना विरोध होत आहे.

‘आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचं महत्त्व सांगतो,’ असे ट्वीट हुसैन यांनी केले. यापुढे त्यांनी मोदी बर्थडे असेदेखील लिहिले आहे. हुसैन यांच्या ट्वीटवर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी यावरुन मीम्स तयार करत हुसैन यांना लक्ष्य केले आहे.

हुसैन यांनी केलेली टीका पाकिस्तानमधील काही लोकांनाही आवडलेली नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील प्राध्यापिका आएशा अहमद यांनी हुसेन आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘पाकिस्तान सरकारचे एक प्रतिनिधी एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानांबद्दल कशी भाषा वापरत आहेत? इतकंच शत्रूत्व दाखवायचे असेल, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, लोकशाहीच्या मार्गाने स्पर्धा करा. पातळी सोडून टीका करुन जिंकणे गौरवास्पद नसते मंत्रिमहोदय,’ अशा शब्दांमध्ये अहमद यांनी हुसैन यांना सुनावले आहे.

fawad-hussain

आपली प्रतिक्रिया द्या