पाकिस्तानमध्ये श्री राम मंदिराची नासधूस, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू मंदिराची नासधूस करण्यात आली आहे. येत्या दिवाळीच्या निमित्ताने जाणूनबुजून हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कोटरी भागात मुस्लिम कट्टर विचारसरणीच्या लोकांकडून ही नासधूस झाली आहे. हे मंदिर श्रीरामाचं असून दान पेटी आणि मूर्तीच्या अंगावरील दागिन्यांची लूट करण्यात आली आहे.

एक अज्ञात माणूस मंदिरात घुसला आणि त्याने काचेची फ्रेम फोडली. त्यानंतर त्याने आतील मूर्तींची विटंबना केली. या प्रकरणी अल्पसंख्याकांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेनंतर मंदिराची स्थिती दाखवणारा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

दिवाळी ऐन तोंडावर आल्याने ही नासधूस केल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारे काही मंदिरांची नासधूस करण्यात आली होती.