
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बुधवारी पाकिस्तानने ताब्यात घेतलेले हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धनमान यांना उद्या शुक्रवारी पाकिस्तान सोडणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले आहे. या तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने संसंदेचे विशेष सत्र बोलावले होते त्या सत्रात इम्रान खान यांनी ही घोषणा केली. वाघा बॉर्डरवरून अभिनंदन हिंदुस्थानात परतणार आहेत
Pakistan Prime Minister Imran Khan: As a peace gesture we are releasing Wing Commander Abhinandan tomorrow. pic.twitter.com/J0Attb6KDC
— ANI (@ANI) February 28, 2019
बुधवारी हिंदुस्थानी हवाई दलाचे मिग-21 विमान पाकिस्तानात कोसळले होते. त्यानंतर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. दरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर संसदेचे एक विशेष सत्र बोलावले होते. त्यात इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानने शांततेचा संदेश देण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्याचे ठरवले असल्याचे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले




























































