लीग खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी वाढवली पीसीबीची डोकेदुखी

पाकिस्तानी क्रिकेट मंडळाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यांच्या खेळाडूंनी पीसीबीची परवानगी न घेताच अमेरिकन लीगमध्ये खेळत असल्याचे पीसीबीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पीसीबी अशा क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई करणार असल्याचे कळले आहे. सध्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंना अमेरिकन लीगमध्ये खेळून बक्कळ कमाई होत आहे. पीसीबीने क्रिकेटपटूंचा हा गैरप्रकार रोखण्यासाठी अमेरिकन लीगच्या आयोजकांना खेळाडूंची एनओसी बंधनकारक केली आहे. जेणेकरून कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या परवानगीशिवाय लीगमध्ये खेळू शकणार नाही. पीसीबीने कडक कारवाईचे संकेत देताच तब्बल 15 क्रिकेटपटूंनी अमेरिकन लीगमध्ये खेळण्यासाठी पीसीबीकडे अधिकृत परवानगी मागण्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे.