
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफरिदी यांना पुन्हा एकदा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. आदियाला जेल प्रशासनाने दहाव्यांदा ही भेट नाकारली आहे. जेलच्या बाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. लोकांनी निवडलेल्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊ दिले जात नाही, असे आफरीदी म्हणाले.


























































