
सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांची आर्थिक फसवणूक करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गायक, संगीतकार पलाश मुच्छल याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. पलाश याने चित्रपटात गुंतवणुकीसाठी विज्ञान माने यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले होते. स्मृती मानधना आणि पलाश यांचा सांगलीत होणारा विवाहसोहळा काही महिन्यांपूर्वी रद्द झाला होता.



























































