
प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च मिळतो ही निव्वळ अफवा समाजमाध्यमांवर पसरवण्यात आली आहे. अशा प्रकारचे सरकारने काहीही जाहीर केले नसून या अफवा पसरवणाऱयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिला आहे.
प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च नगरपालिका आणि महानगरपालिका यांना देण्यात येतो, असे मेसेज समाजमाध्यमांवर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याबाबत पालघर जिल्हाधिकारी डॉ. वैलास शिंदे यांनी अशी कुठलीही बाब केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. परंतु अशा अफवांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
रुग्णांकडून शुल्क आकारणी नाही
जिह्यात कोरोनाबाधित व्यक्तीचे विलगीकरण व उपचार करण्यासाठी प्रशासनामार्फत कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रुग्णांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नसून पूर्णतः मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार दिले जात आहेत. संशयित रुग्णांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता स्वतःहून पुढे येऊन निदान करून घ्यावे, असे आवाहन डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
























































