
दारू पिऊन तर्राट झालेल्या एसटी बसचालकाने शुक्रवारी 55 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. भुसावळहून बोईसरकडे जाणारी ही बस पालघरच्या वाघोबा घाटात येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट 40 फूट खोल दरीत कोसळली, मात्र सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला असून त्यातील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मद्यपी चालक गणेश धनगर याच्यावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



























































