‘आधार’शी लिंक नसेल तरी ‘पॅन’ रद्द होणार नाही, गुजरात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

555

आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक नसेल तरी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. ही जोडणी केलेली नसेल तरी पॅन क्रमांक निक्रिय होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे इन्कमटॅक्स रिटर्न फाइल किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना पॅनक्रमांकाचा वापर करताना कोणतीही आडकाठी येणार नाही.

आधार कार्ड क्रमांकाशी पॅनकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला डिसेंबर 2019 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविली आहे. आधार-पॅन लिंकची मुदतवाढ देण्याची आठवी वेळ आहे. 31 मार्चपर्यंत ही लिंक केली नाही तर पॅनकार्ड क्रमांक निक्रिय करण्यात येईल असे आयकर विभागाने म्हटले होते. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

…तोपर्यंत डिफॉल्टर नाही

आधार कायद्याच्या वैधतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत आधार-पॅनकार्ड लिंक नसेल तरी पॅन क्रमांक निक्रिय करू शकत नाही. ही लिंक न केलेल्या व्यक्तीला सरकार डिफॉल्टर घोषित करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या