
आधार आणि पॅनकार्ड परस्परांना लिंक करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 31 मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. याआधी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. सीबीडीटीने पॅन आधार लिंकसाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधारकार्ड घटनात्मक वैध असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी पॅनकार्डचे वितरण आणि प्राप्तीकर परताव्यासाठी (आयटी रिटर्न) आधारकार्ड बंधनकारक केले होते. त्या आदेशाला अनुसरून सीबीडीटीने नागरिकांना पॅन आणि आधारकार्ड परस्परांना लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

























































