अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ स्पर्धा 4 डिसेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात गेली तीन दशके कार्यरत असणारे दादर-पश्चिम येथील अॅड. बाळ आपटे कॉलेज ऑफ लॉ संस्थेचे चेअरमन व आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमीचे सल्लागार अभय सावरकर यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त 4 डिसेंबर रोजी ऑनलाईन विनाशुल्क अखिल हिंदुस्थानी खुली बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमी, इन्स्टिटयूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होणाया स्पर्धेतील विजेत्यांसाठी एपूण 8 रोख पुरस्कार आहेत.

स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर साखळी 9 फेयांमधील प्रत्येक स्पर्धकाचा सामना 5 मिनिटे वेळेचा राहील. अरेना इंटरनॅशनल मास्टर राजाबाबू गजंगी, इंटरनॅशनल आर्बिटर प्रेम पंडित आदी प्रमुख पंचांच्या मंडळास शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, बुध्दिबळपटू ओमकार चव्हाण सहाय्य करणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाया स्पर्धकांनी प्रवेशासाठी तसेच अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजंगी (9324719299) यांच्याकडे 4 डिसेंबर, सकाळी 11 वाजेपर्यंत संपर्प साधावा.