आधारशी लिंक न केल्यासही पॅनची वैधता राहणार, गुजरात हायकोर्टाचा आदेश

466

आधारशी पॅन लिंक न केल्यास तुमचे आधार रद्द ठरू शकते असे सरकारने सांगितले होते. त्यामुळे पुन्हा आधार पॅन लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 ही नवीन डेडलाईन दिली आहे. परंतु आधारशी पॅन लिंक न केल्यास पॅन वैध राहणार असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आधार कायद्याची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यावर अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत आयकर विभाग पॅन रद्द करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच आधार पॅन लिंक करण्याची डेडलाईन सारखी वाढवणे हे सुद्धा बेकायदेशीर असल्याचे गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे.

फक्त आधार पॅन लिंक न केल्याने पॅन रद्द होऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. असेच आधारची माहिती आयकर विभागाला दिल्यास त्याची खाजगी माहिती फुटू शकते अशी भितीही उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या