मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंढरपुरात

1220

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी पहाटे अडीच वाजता आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हे मंगळवारी (दि. 30) पंढरपूरमध्ये मुक्कामी येणार आहेत.

नगर जिह्याला मिळाला मानाचा वारकरी सन्मान

आषाढी एकादशीसाठी मानाच्या वारकऱयाचा सन्मान नगर जिल्ह्याला मिळाला आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर-पांगुळ या गावातील विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय 84) आणि त्यांच्या पत्नी यांना हा मान मिळाला आहे. आषाढी एकदशीच्या शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत बडे दांपत्य सहभागी होणार आहेत. बडे हे अनेक वर्षांपासून श्रीविठ्ठल मंदिरात वीणा वाजवून पहारा देतात.

आपली प्रतिक्रिया द्या