
सध्या अधिक मास सुरू असल्यामुळे चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत येत आहेत. यातच शनिवार व रविवारी वीकेंडला तर यात्रा भरल्याचाच अनुभव येतो. अधिक मासातील पंधरा दिवसांच्या व महिन्याच्या एकादशीलाही लाखो भाविकांची उपस्थिती राहत असल्यामुळे पंढरीनगरी दुमदुमली जात आहे. मात्र, याच भाविकांना सध्या चंद्रभागेतील अस्वच्छ व गढूळ पाण्याचा सामना करावा लागत आहे. या पाण्याचा उग्र वास येऊ लागला आहे. त्यामुळे मोठय़ा आस्थेने आलेल्या भाविकांना नाईलाजाने दुर्गंधीयुक्त पाण्यातच पवित्र चंद्रभागा स्नान उरकावे लागत आहे. यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, उजनी धरणातून पाणी सोडावे व चंद्रभागा वाहती ठेवावी, अशी मागणी होत आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. सध्या अधिक मास सुरू असल्याने दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. अधिक मासात येणाऱया भाविकांची संख्या विचारात घेता प्रशासनाने भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र, हे नियोजन केवळ कागदोपत्री असल्याचेच दिसून येते. कारण चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी भाविक प्रथम प्राधान्य देतो, हे माहीत असल्यामुळे नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे. मात्र, हे पाणी वाहते नाही. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील पाणीही दूषित झाले आहे.
दरम्यान, नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे शहरातील विशेषतः मुख्य व वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. यामुळे वाहतूककोंडी होत आहे. बहुतांश वाहनधारकांना शहरातील वाहनतळांची माहिती नसल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली दिसून येतात. वाहतूककोंडीची समस्या टाळण्यात वाहतूक पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत.
चंद्रभागा नदीपात्रात विष्णुपद बंधाऱयात पाणी अडविण्यात आलेले आहे. त्यामुळे संत पुंडलिक मंदिरासमोर पायरीपर्यंत पाणी साचलेले आहे. भाविकांना स्नान करण्यासाठी मुबलक पाणी आहे. पाण्यात पाय टाकला की, गढूळ पाणी तयार होऊ लागते. याचा भाविकांना त्रास होत आहे. मात्र, भावनिकता जपत भाविक नदीपात्रात खोल आतपर्यंत जाऊन स्नान करत आहेत. मध्यभागी जरा स्वच्छ पाणी असल्याचे दिसत असले तरी जास्त पाण्यात गेल्यामुळे भाविकांच्या जीवितालादेखील धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने भाविकांची गरज लक्षात घेऊन येथील पाणी खाली सोडून देऊन वरून पाणी सोडावे व नदीपात्र वाहते ठेवावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
नदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माल्य
n चंद्रभागेच्या पाण्यात निर्माल्य, फाटकी कपडे, शिळे अन्न, फळांची सालपटे, नैवेद्य टाकले जात आहेत. तसेच चंद्रभागेची खणा नारळाने ओटी भरली जात आहे. हे साहित्यदेखील नदीपात्रात साचून राहते. यातच येथे वाळवंटात तात्पुरती उभारलेली हॉटेल्स, हातगाडे, रसपानगृह यांचा कचरा, घाण पाणी येथील




























































