पंढरपूर – माजी आमदार सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण, 7 दिवसांची संचारबंदी लागू

638

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये आजपासून 7 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, आज तब्बल 67 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरात 32 तर ग्रामीण भागामध्ये 35  रुग्ण आढळले आहेत. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि त्यांचे बंधू प्रभाकर परिचारक या दोघा बंधूंना कोरोनाची लागण झाली आहे.

पंढरपूर तालुक्यात आजवर 751 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 410 उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर 320 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 29 जणांनी आपला प्राण गमावला आहे.

पंढरपूरमध्ये मागील काही दिवसापासून संतपेठ, गांधीरोड, अनिल नगर, मंदिर परिसरात, इसबावी, रामबाग, कोळे गल्ली, रेल्वे स्टेशन परिसरात दररोज बाधित रुग्ण सापडत होते. त्यानंतर शहरासह आता कोरोनाने ग्रामीण भागात आपला विळखा आणखी घट्ट करण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील अनेक गावांत दररोज रुग्ण सापडत आहेत.

पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये आज आढीव 1, भोसे 21,  करकंब 1,  खेड भोसे 7,  लक्ष्मी टाकळी 1, मेंढापूर 1,  पिराची कुरोली 1, रोपळे 1, शेगाव दुमाला 2 असे रुग्ण आढळून आलेत.  तर शहरांमध्ये अनिल नगर-1 गांधी रोड 1, इंदिरा गांधी भाजी मार्केट 1, जुना कराड नाका 1,  जुनी पेठ 4 कोळी गल्ली 2 लिंक रोड 1 महाद्वार 1,  महात्मा फुले नगर 1, नागपूरकर मठाजवळ 1, नाथ चौक 2,  के बी पी कॉलेज जवळ 2, एमएससिबी जवळ 1, रामबाग 1, संत पेठ 1, सावरकर नगर 1, सावतामाळी मठाजवळ 2, उमदे गल्ली 1, वीर सागर नगर 2 असे शहराच्या विविध भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या