चैत्रीवारी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न, भाविकाविना पंढरी सुनीसुनी

आज चैत्र शुध्द कामदा एकादशी. पंढरपूरमध्ये भरणाऱ्या प्रमुख चार यात्रात चैत्रीवारीचा समावेश आहे. कोरोनाच्या सावटामुळे आजच्या चैत्रीवारीचा सोहळा रद्द केलेला असला तरी चैत्री एकादशीच्या निमित्ताने करण्यात येणारी शासकीय महापूजा मंदिर समितीच्या पुजाऱ्याच्या हस्ते संपन्न झाली.

चैत्रीवारीच्या सोहळ्यासाठी तीन ते चार लाख भाविकांची गर्दी असते यावेळी सोहळाच रद्द केल्याने अवघी पंढरी सुनीसुनी झाली आहे. आजच्या महापूजे प्रसंगी मंदीर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या ॲड माधवी निगडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थितीत होते.

pandharpur

चैत्री शुध्द कामदा एकादशी निमित्त मंदिरात द्राक्ष व द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी 700 किलो द्राक्षाचा वापर करण्यात आला असून संजय टिकोरे या भाविकाने सजावटीसाठी द्राक्ष उपलब्ध करुन दिली आहेत.

pandhari

चैत्री वारी रद्द करीत असल्याचे यापूर्वीच प्रशासनाने जाहीर केलेले होते तथापि भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी संपूर्ण शहराची नाकाबंदी करण्यात आलेली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या