
रेल्वेतून प्रवास करताना पॅण्ट्रीतून जेवणं घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेतील एक किळसवाणा प्रकार समोर आला असून येथील अन्नपदार्थ व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. एका जागरुक प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ केला असून हा अमृत भारत एक्स्प्रेसमधील प्रकार आहे. यावर आता त्या कर्मचाऱ्यासह ठेकेदाराव कारवाई करणार येणार असल्याचे सांगितले.
जागरुक प्रवाशाचे नाव रवी द्विवेदी असे आहे, शहडोस येथे नोकरी करणारे रवि द्विवेदी कटनीहून सतना येथे अमृत भात एक्स्प्रेसने प्रवास करत होते. मात्र आरक्षण नसल्यामुळे ते पॅण्ट्रीजवळच उभे होते. त्याचवेळी त्यांची नजर एका कर्मचाऱ्यावर पडली. जो कचऱ्याच्या डब्यात फेकलेले डिस्पोजल कंटेनर आणि प्लेट्स काढत होता आणि तिथेच तो वॉश बेसिनमध्ये पाण्याने धुत होता. त्यामुळे हे निश्चित होते की, या प्लेट्लमधून पुन्हा जेवण देण्याच्या तयारीत होते. ज्यावेळी रवीने कर्मचाऱ्याला विचारले त्यावेळी त्याने जे उत्तर दिले त्यावेळी ते धक्कादायक होते. कर्मचारी म्हणाला की हे डिस्पोजेबल बॉक्स अर्ध्या किंमतीत परत घेतले जातात. ज्यामुळे हे कंटेनर पुन्हा वापरता येऊ शकतात. मात्र त्याचा व्हिडीओ बनवत असल्याचे लक्षात आले तो संतापला आणि धमकी द्यायला लागला.
रवीने हा व्हिडिओ त्याचा मित्र पंकज शुक्लाला पाठवला, ज्याने तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग केले. व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन हादरले. पंकज शुक्ला म्हणाले की, तक्रारीनंतर रवी द्विवेदी यांना पेंट्री कार कंत्राटदाराचा फोन आला, ज्याने तक्रार मागे घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच देऊ केली. तथापि, रवीने ही ऑफर नाकारली आणि प्रवाशांच्या आरोग्याला होणारा हा धोका उघड करणार असल्याचे सांगितले.
रेल्वेने केली कारवाई
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने X ला प्रतिसाद दिला आणि कठोर कारवाईची घोषणा केली. “ही बाब गांभीर्याने घेत, विक्रेत्याची ओळख पटली असून तत्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची आणि मोठा दंड आकारण्याची कारवाई केली जात आहे असे रेल्वेने म्हटले आहे.