कोरोनाने परळीतील शिक्षकाचा संभाजीनगरमध्ये मृत्यू;बीड जिल्ह्यात कोरोनाचे 16 बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवरील शिक्षकाचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. हे शिक्षक 12 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर प्रथम अंबाजोगाई आणि नंतर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. परळी तालुक्यात कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. तर बीड जिल्ह्यात कोरोनाने 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोना संसर्ग परळी तालुक्यात फैलावत असून यापूर्वी एका महिलेचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथे मृत्यू झाला आहे. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले होते. सोमवारी पुन्हा सिरसाळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षकाचा उपचार सुरु असतानाच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे.