परळीत विवाहितेवर बलात्कार; महिलेने केली आत्महत्या

967

घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका महिलेवर बळजबरीने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. अत्याचार झाल्याच्या घटनेने मनस्ताप झाल्यामुळे पीडित महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समजते आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ग्रामिण पोलिसामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील गोपाळपूर येथे सोमवारी रात्री धक्कादायक घटना घडली. दहा ते अकराच्या सुमारास घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेच्या घरात घुसून बळजबरीने बलात्कार केला. अत्याचार झाल्याने पीडित 25 वर्षीय महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अत्याचारित महिलेच्या पतीने परळी ग्रामिण पोलिसामध्ये धाव घेत तक्रार दिल्यानंतर परळी ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या