परळी यात्रेसाठी रहाट पाळणा बसवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

1171

परळी येथील वार्षिक यात्रेत मनोरंजनाचे विविध साधने येत असतात. यामध्ये रहाट पाळणे, टोरा-टोरा, मौत का कुआ यासारखे अनेक प्रकारचे मनोरंजन करणारे खेळ येत असतात. याची मांडणी करण्यासाठी यासंबंधीत असलेले कर्मचारी 2-3 दिवस आधी शहरात येत असतात. यंदाही शहरात यात्रेसाठी रहाट पाळणा बसवताना आलेल्या एका व्यक्तीचा गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात्रेकरू नसल्याने मोठी हानी टळली आहे.

शहलाल उर्फ पिंटू शिवलाल पुसरे (वय 25, रा. सुराजीटोला,रागादही, ता. जि. शिकवणी,मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यात्रेच्या ठिकाणी रहाट पाळणा बसवत असताना या व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या हातातील लोखंडी रॉड जवळून जात असलेल्या विजेच्या तारेला लागल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसला. यानंतर खाली पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला परळी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान प्रशासनानवर यात्रेबाबत काही खबरदारी घेतली की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या