
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे. शनिवारी दिवसभरात 3 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला तर 94 व्यक्ती बाधित आढळल्या. जिल्ह्यात 7 कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालय प्रशासनाद्वारे सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला.
शनिवारी परभणी ग्रामीणमधील आर्वी येथील एक महिलेस, परभणी शहरातील गव्हाणे चौकातील एका महिलेस, प्रताप नगरातील एक महिला, दोन पुरूष, रंगनाथ नगरातील, शिवाजी रस्त्यावरील प्रत्येकी एक महिला, बालाजी नगरातील एक पुरुष असे एकूण दोन पुरूष व पाच महिलांना डिस्चार्ज देण्यात आला.
शनिवारी जिल्हा कारागृहातील 52 पुरूष कोरोनाबाधित आढळले. या शिवाय क्रांतीचौक, गांधीपार्क, एस.पी.ऑफीस, स्वच्छता कॉलनी, क्रांतीनगर, परभणी आयसीयू येथील प्रत्येकी एक पुरूष, धनुबाई प्लॉट येथील एक महिला, एक पुरूष व चार वर्षीय बालक, पोलिस क्वॉर्टर येथील दोन महिला, दोन पुरूष व तीन वर्षीय बालिका, सरफराज नगर व दत्तनगरातील प्रत्येकी एक पुरूष, परभणी तालुक्यातील सायळा खटिंग येथील एक महिला, एक पुरूष, लिमला येथील एक पुरूष, पाथरी शहरातील नगर परिषद कॉलनीतील एक पुरूष, ग्रामीण रुग्णालय क्वॉर्टरमधील दोन महिला, पोलिस क्वॉर्टर येथील एक पुरूष, बाबा कॉलनीतील एक महिला, दोन पुरूष, मानवत शहरातील गटू गल्लीतील एक महिला, गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील एक पुरूष, सोनपेठ येथील लहुजी नगरात एक महिला, कदम गल्लीतील एक पुरूष, कुंभार गल्लीतील दोन पुरूष, महाजन गल्लीतील एक महिला, पूर्णा शहरातील सिध्दार्थ नगरातील एक पुरूष, अंबिका नगरातील एक पुरूष, एमआर पेट्रोलपंपाजवळील एक पुरूष, श्रीरामनगरातील एक महिला, एक पुरूष व 15 वर्षीय बालिका, व्यंकटी प्लॉट भागातील एक पुरूष, पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी व पांगरा येथील प्रत्येकी दोन पुरूष असे एकूण 81 पुरूष व 13 महिला म्हणजेच 94 जण कोरोनाबाधित आढळले.
परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागातील एक महिला, दर्गारोड भागातील एक पुरूष, मानवत तालुक्यातील एक कोरोनाबाधित युवतीचा मृत्यू झाला. कक्षात भरती रुग्ण 1095 आहेत. आतापर्यंत 94 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत 94 कोरोना बाधित आढळले. एकूण 12553 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून त्यातील 10326 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 1975 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 152 स्वॅब अनिर्णित असून 60 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 40 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.
























































