14 एप्रिल पर्यंत 2 हजार पिशव्यांचे रक्तसंकलन पुर्ण होणार – डॉ. राहुल पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या नियोबध्द रक्तदान कार्यक्रमास शहराच्या विविध भागातील महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभत असून येत्या 15 एप्रिल पर्यंत 2 हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचा संकल्प पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ.डॉ. राहुल पाटील यानी केले.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी परभणीत रक्ताचा तुटवटा भासत आहे. आ.डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेत नियोबध्द रक्तदान कार्यक्रम विधानसभा मतदार संघात शहरी व ग्रामीण भागात सुरु केला असून परभणी शहराच्या विविध भागातून 500 च्या वर महिलांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. 30 मार्च ते 14 एप्रिल या दरम्यान रक्तदाानाचा हा कार्यक्रम राबवला जात असून शहरातील नावंदर हॉस्पीटल , सिध्दीविनायक हॉस्पीटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व लाईफ केअर ब्लड बॅक या ठिकाणी दररोज सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत नोंदणी केलेल्या रक्तदात्याकडून रक्त संकलीत केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे रक्तदात्यांना विशेष पास चे वितऱण करण्यात आले आहे.