विहिरीत पडलेल्या बिबट्याला 14 तासानंतर बाहेर काढण्यात वनविभागाला आलं यश

जिंतूर तालुक्यातील वाडी शिवारातील एका विहिरीत मंगळवारी उशिरा सायंकाळी बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तब्बल 14 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाला यश आलं आहे. या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं असून त्याला नागपूर येथील राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वापर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महादेव बाबासाहेब पवार यांच्या विहिरीतील एका कपारीत बिबट्याचा बछडा असल्याचे दिसून आले. त्यानंतर या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही पथकाने सोबत आणला होता. मात्र हा बिबट्या विहिरीत असल्याने पिंजरा विहिरीत सोडण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आली. या बिबट्याला पिंजर्‍यात अडकविण्यासाठी रात्रभर पथकाने प्रयत्न केले.

आपली प्रतिक्रिया द्या