परभणी- विलगीकरणात ठेवलेल्या 33 मजुरांची होणार घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिंतुर तालुक्यातील चारठाणा या गावापासुन जवळच असलेल्या मौजे गोंडगे प्रिंप्री येथील 6 कुटुंबातील 33 मजुरांची घरवापसी होणार आहे.

हे मजूर पुणे येथील वाघोली परीसरात दगडी खडी फोडण्याचे काम करण्यासाठी गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडले होते. तेथील एका आयशर टेप्पो भाड्याने करून त्यांना जीवनावश्यक वस्तुचे स्टीकर लावून ते 12 एप्रिल रोजी त्यांच्या मुळगावी परताना यांना बीड जिल्ह्याच्या हद्दीतील गंगामसला सीमेवर पोलिसांनी या संशयास्पद वाटला होता. यामुळे यांची चौकशी केली तर यामध्ये 33 मजूर आढळून आले. या सर्व मजुराना माजलगाव येथील माऊली लॉन्स येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात 24 दिवसांसाठी विलीनीकरणात ठेण्यात आले. त्यांचा 24 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील गावाकडे जाण्यासाठी त्यांना परवानगी मिळत नव्हती.

त्यामुळे सदर मजुरांनी या बाबतची माहिती प्रिंप्री गोंडगे येथील सरपंच माणिक सुर्वे, यांनी नानासाहेब राऊत यांनी या बाबत माजलगावचे तहसीलदार प्रतिभाताई गोरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मजुर त्यांच्या मूळगावी पाठविण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने तहसीलदार गोरे यांनी बीड जिल्हा अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बीड जिल्हा अधिकारी यांनी संबंधित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी 6 मे रोजी दिली असून संबंधित मजुरवर्ग आज 9 मे रोजी मूळगावी परतणार आहेत.