वाळूच्या टिप्पर ची धडक तीन तरुण जागीच ठार

419

परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगातील टिपरने दिलेल्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात अंबाजोगाई-परळी रोडवरील काळवीट तांडा परिसरात शनिवारी (दि.08) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास झाला. मयत तिघेही तरुण परळी तालुक्यातील वानटाकळी येथील आहेत.

नागनाथ महादेव गायके (वय 35), वसंत जनार्दन गायके (वय 45) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (वय 23) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 13 बीडी 5684) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या