परळीत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना तहसील कार्यालयात मारहाण

1535

प्रशासन कोरोनासारख्या संकटाला तोंड देत असताना परळी तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या बाबु राव रुपनर यांना बेलंबा येथील काही जणांनी गुरुवारी दुपारी 4 वा च्या दरम्यान शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

एकीकडे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रशासन कोरोनाच्या संकटात काम करताना परळीत महसूल अधिकाऱ्यांवरच काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. आपले काम राहिल्याचे कारण देत कक्षात घुसून त्यांना मारहाण झाली आहे. फेरफारिच्या मागणीवरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याचा तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या