
परळी ही देशभरात ओळखली जाते ती दोन कारणांमुळे एक म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथांचे मंदिर आणि दुसरे म्हणजे 1971 साली सुरू झालेले शहरातील औष्णिक विद्युत केंद्र.पण आता हे जुने झालेले केंद्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे.परळीत एकूण 1,2,3,4,5,6,7,8 असे आठ संच आहेत. यापैकी संच क्र.1,2,3,4,5 हे जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच होते तर संच क्र.6,7,8 हे वडगाव जवळच्या नवीन विद्युत केंद्रामधील संच आहेत.
जुन्या केंद्रातील संच क्र.1,2,3 हे या याआधीच बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. नोव्हेंबर 2019 रोजी महावितरणने जुन्या संचामधील क्र. 4-5 बंद करुन ते मोडीत काढण्याचा निर्णय महावितरण ने घेतला आहे. संच क्र. 4 हा 1985 साली सुरू केलेला होता तर संच क्र.5 हा 1988 साली सुरू झालेला होता हे दोन्ही संच प्रत्येकी 210 मेगा व्हॅट इतक्या क्षमतेचे होते. साधारण 30 वर्षे या संचांमधून वीजनिर्मिती करण्यात आली. गेले काही वर्षे वीज उत्पादनाचा वाढत्या खर्चाचे कारण दाखवत या संचांमधून वीजनिर्मिती बंद करण्यात आली.
सन 2015 साली केंद्राने देशातील जुने झालेले 210 मेगा व्हॅट किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे संच बंद करण्याचे आदेश काढले होते. अखेर या सर्व संचांना कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परळीसह राज्यातील चंद्रपूर,भुसावळ, परळी,खापरखेडा,पारस या ठिकाणचे जुने संच बंद करण्यात येऊन त्याठिकाणी बदली संच देण्यात आले आहेत.याचाच भाग म्हणून परळीत संच क्र.6,7,व 8 हे नवीन संच महावितरण ने उभे केले आहेत.एकेकाळी केवळ परळी शहराचेच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे वैभव असलेले संच आता बंद करण्यात येणार आहेत.





























































