अधिवेशनाचे सूप वाजले

मणिपूर प्रश्नावरून प्रचंड गदारोळ, सभात्याग, अविश्वासदर्शक ठराव, वादग्रस्त विधेयके यामुळे गाजलेले संसद अधिवेशन शुक्रवारी संस्थगित करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभेत अधिवेशन संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.  लोकसभेत 39 तास काम झाल्याचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.