Live – राज्यसभेचे 250 वे सत्र म्हणजे एक विचारधारा – मोदी

2124

मोदी सरकाराच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. मंदी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक भूमिकेत आहे. तसेच शिवसेनेच्या भूमिकेकडेही साऱ्यादेशाचे लक्ष लागले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील live अपडेट

 • मोदींनी केले राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेत कौतुक
 • राज्यसभेने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले – मोदी
 • राज्यसभा कधीच भंग होणार नाही – मोदी
 • कर्तृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले – मोदी

 • राज्यसभेचे 250 वे सत्र म्हणजे एक विचारधारा – मोदी
 • आतापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी – मोदी
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत तातडीने द्या, जोरदार मागणी करत शिवसेनेचे लोकसभेतून वॉकआऊट

 • वीज बिलं माफ करा, शेतकऱ्यांना आधार द्या, शिवसेनेकडून संसदेच्या प्रांगणात जोरदार निदर्शनं
 • शिवसेनेकडून संसदेच्या प्रांगणात जोरदार निदर्शनं
 • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

 • अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेकडून लोकसभेत स्थगन प्रस्ताव

 • भाजपचे खासदार मनोज तिवारी सायकलवर स्वार होऊन संसदेत पोहोचले

 • सभागृहात सर्व मुद्द्यांवर मोकळेपणानं चर्चा व्हावी. सर्वांनी चर्चेत सहभाग घ्यावा. सभागृहात संवाद आणि चर्चा व्हावी, देर्जेदार चर्चा व्हावी हे महत्त्वाचं- मोदी

 • गेल्या काही दिवसांत सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली. गेले सत्र देखील खासदारांच्या सहयोगामुळे महत्त्वाचं ठरलं – मोदी

 • 2019 मधील संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असेल. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसभेचे दोनशे पन्नासावे सत्र आहे. तसेच देशाने संविधान स्वीकारण्याचे हे 70 वे वर्ष आहे – पंतप्रधान मोदी

 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहोचले

 • शेतकऱ्यांचे प्रश्नही गंभीर
 • मोदी सरकारला मंदी-बेरोजगारीवरून घेरण्याची विरोधकांची तयारी
 • आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, मंदी-बेरोजगारीचं सावट
आपली प्रतिक्रिया द्या