पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅरोलवर बाहेर असलेल्या सुनील चंदनशिवे या आरोपीने मुलुंड येथील दोन उद्योजकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उद्योजक आदित्य श्रीरसागर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुनील चंदनशिवे हे गुरुवारी सात ते आठ महिलांना सोबत घेऊन आले. त्यांनी ’अतुल प्रोजेक्ट’चे सुरेश काळे यांना शिवीगाळ केली व धमकी दिली. हे कळताच काळे यांचे पार्टनर श्रीरसागर तेथे पोहोचले. त्यांच्यासमोरही चंदनशिवे यांनी काळे यांना शिवीगाळ केली. ते काळे यांना मारण्यासाठी धावले असताना श्रीरसागर मध्ये पडले तर त्यांनाही शिवीगाळ केली. खोटय़ा केसमध्ये अडकवण्याची व जीवे मारण्याची धमकीही दिली, असे श्रीरसागर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ’चंदनशिवे यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असून त्यांच्यावर कडक कायदेशीर करावी, अशी मागणी श्रीरसागर यांनी केली आहे.