पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली ठगाने खासगी पंपनीत काम करणाऱया प्रोजेक्ट मॅनेजरची 8 लाख 87 हजारांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे खासगी पंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. चार दिवसापूर्वी त्यांना एक मेसेज आला. त्यांना पार्टटाइम जॉब करायचा असल्याने त्याने त्या नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये जोडले गेले. यूटय़ूब व्हिडीओ चॅनेलला जोडले गेल्यावर 50 रुपये मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. ठगाने त्यांना टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये जोडून त्याना लिंक पाठवल्या. सुरुवातीला त्यांना दीडशे रुपये पाठवले गेले. ते चॅनल विकत घेण्यासाठी त्यांना दोन हजार पाठवण्यास सांगितले. दोन हजार गुंतवल्यास 2950 रुपये मिळतील असे त्यांना सांगितले. त्यानंतर ठगाने त्यांना जास्त पैशाचे टास्क घेतल्यास अधिक नफा मिळेल, अशा भूलथापा मारल्या आणि फसवणूक केली.