मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार, मराठा आंदोलनात पार्थ पवारांची उडी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला दिलेल्या स्थगिती विरोधात मराठा संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून राज्यात आंदोलने सुरू झाली आहे. बीडमध्ये एका तरुणाने केलेल्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यालायात जाणार असल्याचे म्हणत या आंदोलनात उडी घेतली आहे.

विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिकाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही. मराठा आंदोलनाची धगधगती मशाल हृदयात ठेवून लाखो तरुणांसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास आपण तयार असल्याचे पार्थ पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे, असं ट्विट करत आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या