इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू, मागील एका महिन्यात आलेल्या प्रवाशांवर लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या काळात इंग्लंडहून मुंबईत आलेल्या  प्रवाशांची यादी राज्य सरकारला मिळाली आहे. या प्रवाशांची नावे प्रत्येक जिल्ह्यात आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी

इंग्लंडमधून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर त्याच्या संपका&त आलेल्या व्यक्तींचाही शोध घेण्यात येईल. अशा सर्वांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येईल.  कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपका&त आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.

राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण

महाराष्ट्रात लसीकरण करण्याची तयारी पूर्ण झाली  असून आता आम्ही केवळ केंद्राच्या निर्देशाची वाट पाहत आहोत. भारत बायोटेक, सिरम या संस्थेने केंद्राकडे परवानगी मागितली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड ही लस देण्यासाठी तयारीत आहे. मात्र कोणती लस घ्यायची हा केंद्राचा निर्णय आहे. त्यांनी त्वरित निर्णय घेऊन राज्याला सूचना कराव्यात, असे राजेश टोपे म्हणाले.

लंडनमधील विषाणूचा शोध

चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये (एनआयव्ही) पाठविण्यात येतील.  या तपासणीतून विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणूशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल. प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आढळली तरी पुढील 28 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल.